-->

Deal's of The Month

अंदाजे ४०० वर्षांपूर्वीची ही गोष्ट

 *अंदाजे ४०० वर्षांपूर्वीची ही गोष्ट.* आपला *तुकोबाराया अभंग लिहायचा. जीवनाचं सार सांगायचा. आणि लोकं त्या अभंगांमध्ये दंग व्हायचे.* सगळं छान चाललं होतं. पण *रामेश्वर भटाला हे सगळं पचणीच पडत नव्हतं.* तुकोबा लिहायचा आणि रामेश्वर भटाचा जळफळाट


व्हायचा. शेवटी भटाचा संयम संपला आणि त्याने फर्मान काढले. *"तुक्या.. तुझ्या अभंगात वेद आहेत. वेदांचे अर्थ तू सांगतो. पण तू शूद्र आहेस. त्यामुळे तुला ते बोलण्याचा वा लिहिण्याचा अधिकार नाही."* असं म्हणत रामेश्वर भटाने *तुकोबारायाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्या.*

गाथा बुडताच *तुकोबाचे विरोधक फार आनंदी झाले.* या असुरी आनंदापायी ते अक्षरश: नाचायला लागले. पण *दुसरीकडे मात्र दुःखाची छटा पसरली. तुकोबाचे अभंग ऐकणारी माणसं प्रचंड दुखावली. रडू लागली. खुद्द तुकोबाराया दुःखी झाला. अन्नपाणी त्यागून एका शिळेवर जाऊन बसला.* तुकोबाराया दुःखी झाल्याचे समजताच तुकोबारायाचे समर्थक चहूकडून जमा झाले. बघता बघता अलोट गर्दी जमली. तुकोबाचे समर्थन करायला हा जनसमुदाय तिथे येऊन बसला. *लोक मुखपाठ असलेले अभंग गायला लागले.* आणि *संत जगनाडे महाराज व १४ टाळकरी यांनी एकत्रितपणे पूर्ण गाथा अवघ्या १३ दिवसात लिहून काढली.* तुकोबा ध्यानस्थ बसले असताना लोकांनी *"गाथा वर आल्या"* असे म्हणत जल्लोष केला. 

रामेश्वर भटाने *केवळ द्वेषापायी* तुकोबारायाच्या गाथा बुडविल्या होत्या. पण *तुकोबा लोकांमध्ये वावरणारा आणि लोकांसोबत रमणारा असल्याने त्याचे अभंग लोकांना मुखपाठ होते.* *तुकोबांना हरवायला निघालेला भट स्वतःच हरला.* गाथा पुन्हा जिवंत झाली आणि *आजतागायत ती जिवंत आहे.* आणि *कायम जिवंतच* असणार आहे. *तुकोबाराया खरंच महान होता.*

तर सांगायचं तात्पर्य हेच की अश्या आपल्या *महान तुकोबारायांचे ४०० वर्षांपूर्वी ज्यांनी पुष्पक विमान आणून वैकुंठगमन घडवून आणले, त्यांच्यासाठी ईव्हीएम हॅकिंग वगैरे फार मोठा विषय नाहीय.* ते काहीही म्हणजे काहीही करू शकतात. 😊


*तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा...‼️*

Post a Comment

0 Comments